आमच्याविषयी

ग्रामपंचायत सवणस खुर्द




आपले सहर्ष स्वागत करते. ग्रामपंचायत सवणस खुर्द मध्ये एकूण तीन वाड्या आहेत.रांगलेवाडी, बौद्धवाडी, मोहल्ला, या गावामध्ये सर्व धर्माचे लोक राहतात.गावामध्ये सर्व धर्माचे देवस्थाने, झोलाई माता मंदिर, बौद्धविहार, मस्जित, असून गावामध्ये सर्व प्रकारची देवस्थाने असून सर्व जाती धर्माचे लोक एकत्रीतपणे येवून परंपरागत सन साजरे करतात. सवणस खुर्द हे गाव खेड शहरापासून २४ कि.मी. अंतरावर आहे.गावात गणेशोउत्सव, दिवाळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान-बकरी ईद ई. सन साजरे केले जातात.


गावात युवक व महिला बचत गट सक्रिय असून सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग असतो. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व सार्वजनिक आरोग्याबाबत गावकरी जागरूक असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे प्रयत्न करतात.


  • गावातील 100% विधवा महिलांना विधवा सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. हे आपल्या गावचे नावीन्यपूर्ण काम आहे
  • महिला सभा
  • प्लास्टिक बंदी जनजागृती करणे करिता दुकानदारांना नोटीस लागू करतेवेळीचे आहेत